बाबलो (मालवणी कविता)

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, December 26, 2014, 08:06:55 PM

Previous topic - Next topic
बाबलो (मालवणी कविता)

( ' अक्षरसंपदा ' दिवाळी अंक २००० मध्यें प्रकाशित)

शाळेक मारता दांडयो आणि
बाबलो व्हाळार गरयता
चॉकलेटा खावन् बापाशीचे
पैशे सगळे सरयता

भोकाड पसरून रडता मेलो
"शाळेत जा" म्हटल्यावर
शाळेची येळ झाली तरी
बसून रवता खाटल्यावर

मारून मुटकून धाडलोच तर
शाळेत अभ्यास करणाच नाय
म्हणता " माझ्या डोस्क्यात तुमचो
अभ्यास मुळीच शिरणा नाय"

आवस् बोलली "हेचा आता
शाळेतला नाव काढू या
मोठेपणी तेका आपलो
राजकारणातच धाडू या"