येशिल ना येशिल ना....

Started by सुमित, December 29, 2014, 10:12:24 PM

Previous topic - Next topic

सुमित

येशिल ना येशिल ना
स्वप्नी राणी येशिल ना
सहजच होता स्पर्श तुला ग
नकळत डोळे मिटशिल ना
येशिल ना.........

जरा मदभरी नयन तुझे
तरि नशेचे भान नसे
या नशिल्या डोळ्यांनी
अलगद वार करशिल ना
येशिल ना.........

मऊ मखमली केस तुझे
आकाशीचे मेघ जसे
या रेशमी केसांना
मज चेह-यावर धरशिल ना
येशिल ना.........

गोड गुलाबी ओठ तुझे
पाकळी दोन गुलाबच ते
या रसभरी ओठांना
मज अधरावर धरशिल ना
येशिल ना.........

निखळ नितळ हे रुप तुझे
रंभेचे लावण्य जसे
या रेखीव लावण्याला
मज मिठीत तु भरशिल ना
येशिल ना.........

सुमित 9867686957

कालिंदी



नाहीं  नाहीं  नाहीं!