हे तर प्रेम आहे ...

Started by durga, December 31, 2014, 04:51:50 PM

Previous topic - Next topic

durga

हाक माझी ऐकून साद मला देशील का ?
भाव वेड्या भावनाना समजून तू घेशील का ?
गंध प्रितिचा फूल हे मनातले
उमलु तू देशील का ?

तुझ्याच जवळ नेती मला
तुझी हो ओढ़ कसली
कोणते शब्द् हे ओठातूनी
आज का निघाले बेभान हे रंगले
मस्ती भरे क्षण आज बेधुंदिने नाचले

चाँदन्याचे गीत झाले
गगन सारे झंकारले
वार्या वरती सुर उमटला
हे तर वेडे प्रेम तुझे
हे तर वेडे प्रेम तुझे ....

              दुर्गा वाड़ीक़र