निरोगी शरीरासाठी

Started by sanjay limbaji bansode, January 02, 2015, 03:09:34 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

नक्की वाचा , तुमच्या फायद्यासाठी


पानाचा देठ मजबूत नसेल तर पान गळून पडत.
कारण पिकलेला किंवा कमजोर देठ पानाला कधीच साथ देत नाही ! थोडीही वाऱ्याची झुळूक येता ते पान गळून खाली पडतं.
तसेच आपल्या जीवनाचेही आहे.रोगी शरीर ही आपल्या जगण्याला साथ देत नाही व आपल्या देहातून ते बाहेर पडतं
एक पान गळून पडले तर झाडाला काही फरक पडत नाही,कारण झाडाला अनगिनत पाने आहेत
तसेच आपण या दुनियातून गेलो तर,या संसाराला काही फरक पडत नाही
मित्रांनो हा मानव जन्म भेटला तर का कीड़क,रोगी,बीमार राहुन जगायचं
मला माहीत नाही की मी या जन्मा अगोदर काय होतो ! मेल्या नंतर काय होणार,हे मला माहीत नाही व याच्याशी काही घेणे देने नाही.मला फक्त येवढे माहीत आहे की हा माझा मानव जन्म आहे.व या जन्मात मला निदान साठ वर्ष तरी स्वस्थ व निरोगी जगायचं
मित्रांनो आपण सर्वाना वेळ देतो - आपण जिथे काम करतो तिथे,आपल्या कुटुंबाला,मित्राला,देवाला,नातेवाईकाला
पण आपण आपल्या शरीरासाठी कधी वेळ दिला का ? आपण चोवीस तासामधे निदान एक तरी तास वेळ देतो का ?
माझ सांगायचे तात्पर्य येवढेच आहे की,या चोवीस तासामधला एक तरी तास आपले शरीर निरोगी करण्यासाठी ठेवा.
सकाळी रोज जर आपण व्यायाम केला थोडे धावलो तर नक्कीच आपण साठ वर्ष निरोगी राहाल.

हा मेसेज दुसऱ्या ग्रुप मधे पाठवला  नाही तरी चालेल
पण आत्मसात नक्की करा


संजय बनसोडे