पावसाच्या सरी सारखं.....

Started by SHASHIKANT SHANDILE, January 03, 2015, 04:41:47 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं
जीवनाच्या ओठांवरती शब्द फक्त माझे असावे
प्रेम त्याच्या मनी फक्त माझ्यासाठीच असावे

जसं जोडपं लैला-मजनू आणी हिर-रांझ्याच
तसं जोडपं माझ्यासंगी कुणीतरी जुद जूडवावं 
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी जीवन आपलं माझ्यासाठी अर्पावं

नको मला ती हीन भावना नको मला ते प्रेम स्वार्थी
विचार त्याचे जगापेक्षा गगण भेदी असावे
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी जीवन आपलं मजजीवनाशी मिळवावं

मीही स्वप्नामध्ये दूर ऊडावं थोडं हसावं थोडं रडावं
कुणाच्यातरी प्रेमामध्ये रात्रीलाही जागावं
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
मात्र त्याला प्रेमाचे पूर्ण ज्ञान असावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं

शशिकांत शांडिले (SD), नागपूर
Its Just My Word's

शब्द माझे!

akshay tambe

aahes khar rupachi rani..
janu ekhadi shukrachi chandni..
kadhi-kadhi vichar yeto aahes konavani...
kadhi vatates devyani...
tar kadhi kalyani...
pn tuch majhya hrudayachi raani..
aani tujhyapasunach suru majhi premkahani...
kharach aahes rupachi raani...
janu ekhadi shukrachi chandni...