आयुष्याची बेरिज वजाबाकी

Started by Aishu, January 05, 2015, 09:28:18 AM

Previous topic - Next topic

Aishu

का मला आज असं होतंय
का खुप एकटं एकटं वाटतंय
लागलेले डोळे माझे आशेकडे
मन मात्र मोकळच माझ्याकडे...

सुरु झालीय अचानक मनात
आयुष्याची बेरिज वजाबाकी
काय मिळवलं काय गमवलं
पडताळा जुळतोय कि काही बाकी...

डोळ्यांदेखत निसटल्या गोष्टी
आठवण मात्र अजूनही येते सारखी
घबाडाच्या नादात गमवलं खुप काही
खंत गमवल्याची डसते हृदया सारखी...

का ठेवले नाही स्वत:साठी क्षण काही
मर्जी संभाळताना प्रत्येकाची भानच राहीले नाही
झेलली दु:खे बरिच अजुनी उरी बाकी काही
कसरतीत तारेवरच्या झाली जिवाची लाही लाही...

माझ्या जिवनाची लांबी रुंदी मी
का नसेल स्वत:साठी मोजून घेतली
सर्वांना सुखे देऊन ज्यांची त्यांची
दु:खे मात्र मज पदरात पाडून घेतली...

विचार येतो खरंच शेवटच्या क्षणी
फार उशिर झालाय कि मलाच नव्हती घाई
लांबी रुंदी अन् झाली बेरिज वजाबाकी
यावा नकळत तो अन् जिवनाची सांगता व्हावी ...

ऐश्वर्या सोनवणे  मुंबई