सुर्य मावळला सांज झाली..................

Started by SHASHIKANT SHANDILE, January 05, 2015, 05:23:27 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

सुर्य मावळला सांज झाली पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवति फुले आता मात्र चुपचाप झाली

दिवसभर कामाची गोंधळ आता शांत चहाचा प्याला
दिवसा पाहून शेताची हिरवळ मजमन आता नाचत आहे
सकाळी उठता कामाची कटकट आता मात्र खाऊनि झोपा
कर्जापाई पोट कुशीशी मैतर माझे फासावर गेली
लावली मैनत निघत नाही शेवटी काय उरलय हाती
सुर्य मावळला सांज झाली पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवति फुले आता मात्र चुपचाप झाली

उपाशी पोटी मुले झोपली मनोमन तीहि रडत होती
तिलाही चिंता परिवाराची दिवसभराच्या या खर्चाची
नित्य समई ती रोज उठती उठून सकाळी भाकर करती
भाकर घेउनि शेती गेलो दृष्य पाहुनी मग मी हादरलो
वानरराजे उध्वंस करती शेताभर जणू ते नृत्यच करती
सुर्य मावळला सांज झाली पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवति फुले आता मात्र चुपचाप झाली

चैत्र आला पिके कापिली कोण जाने काय नशिबी
पुन्हा घेतला कर्ज कापाया उणीव राहते हव्या दर्ज्याची
विकाया माल बाजारी गेलो रंग भरविला त्या दलालाले
तो म्हणाला  तीन चार गळ्यापर्यंत आली माझ्या फास
चार हजार भाव मिडाला या वर्षाचा खर्च निघाला
सुर्य मावळला सांज झाली पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवति फुले आता मात्र चुपचाप झाली

उद्या पुन्हा कामाची गोंधळ आता शांत चहाचा प्याला
सुर्य मावळला सांज झाली पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवति फुले आता मात्र चुपचाप झाली

शशिकांत शांडीले (SD), नागपूर   
Its Just My Word's

शब्द माझे!

सतिश

कविता छान आहे.. आशय अतिशय सुंदर...  पण आणखी थोडी सुसूत्रता असायला हवी..
म्हणजे हीच कविता अप्रतिम वाटेल.

SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!