समाजवाद

Started by Shivshankar patil, January 08, 2015, 08:18:55 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

समाजवाद

पोर कोणाचे फिरे रस्त्यावर
कपडा नसे अंगावर
एक फाटकी जांग
नाकातुन ओघंळे हा शेंबूड
होतो वांरवार पुढे मागे दट्यापरी
अंगावर मळ साचलेला
वाटे कैक सालांची ही ठेवण
वाकडी जर्मन परात हाता मध्ये
हिच तयाचे भांडवल
ओगंळ रूप दावूनी जगाला
ओशाळभूता प्रमाणे पहात
भरे पोट आपले रस्त्यावर
झाली कैक वर्ष स्वातंञ मिळवून
हाच का तो आमचा समाजवाद....

शिवशंकर बी.पाटील
वरिष्ट तुरूंगाधिकारी 9421055667