न्यायाची होळी

Started by SONALI PATIL, January 09, 2015, 04:43:46 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

याच तुझ्या धरणीवरती
होतेय न्यायाची होळी
का लावलीस तू
डोळ्यावरती काळी शाई..

किती खोडील्या कळ्या
अन किती तुडवील्या पायदंळी..

लाचखोरांचे गवत वाढले
धान खुंटते पावलो पावली..

गुन्हेगारीने तुरूगं भरले
का तोडतात ते मुफ्त भाकरी ।

का सत्याला करावी लागते
बेईमांनाची चाकरी ।

रंग जातीचा चडतो आहे
का माणुस माणसास पोरका...

का हात ओला केल्या विना
देवही दर्शन देत नाही ।

का पाहुन सारे दृष्य इथले
मन तुझे उफाळत नाही...

माणसास या नव्याने जन्म देण्या
का धरणीमाई तु फाटत नाही..


sonali patil.