संकीर्तनी

Started by विक्रांत, January 11, 2015, 09:45:51 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

तुझे भक्त गाती
संकीर्तनी नाचती   
नकळे कसे काय
झपाटूनी जाती 

तो नाद तो आवेग
भक्तिभाव पाहूनी
मी ही जातो कधी
गर्दीत त्या मिसळूनी 

नाचतो अन गातो
हात ही उंचावूनी   
रितेपण माझे असे 
रितेच रिते राहुनी   

गमते मजला मग
व्यर्थ सारी करणी   
थांबतो मी येतो
बाजूस नाईलाजानी

विक्रांत प्रभाकर