नको लावूस फास,

Started by SONALI PATIL, January 12, 2015, 07:42:35 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

पावसाच ईघीन,केव्हां येईल,
सांगता माञ येणार नाही.
होत्याच नव्हत, कधी होईल ,
सांगता माञ येणार नाही.
ताई दादांच्या हाता मध्ये,
पाटी पेन्सील माञ जरूर दे.
शिक्षणाने दगा फटका ,
नक्कीच कधी होनार नाही .
पिक जातील करपून जेंव्हा जेंव्हा,
तेंव्हा ताईच्या लग्नाची,
फिकीर माञ होनार नाही.
शिक्षणाने दगा फटका ,
नक्कीच होनार नाही .
नको लावूस फास,
जेव्हां नियती करेल घात.
उद्याच्या दिवसाला,
राञ काही अडवणार नाही.
राञ असते अंधेरी जेंव्हा जेंव्हा,
जपुन पाऊले टाका तुम्ही,
हाता मध्ये हात घेऊन,
मिळून काळाशी लढा तुम्ही.

sonali patil