खरच सांग ना ग वेडे., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

Started by AKSHAY BHALGAT, January 17, 2015, 01:53:50 PM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

सोबती नसून आज सुद्धा , तू असल्यासारखी भासते ,
खरच सांग ना ग ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

खातानाही घास माझा हा ., ओठीच येउन थांबतो .,
समोर जशी तू उपाशी तशी ., मग मी जेवणच टाळतो .,
तुझ्या आठवणीतच माझे ., भरगच्च पोट भरते .,
खरच सांग ना ग वेडे  ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

उन्हातून चालते वेळीही ., स्पर्शावतो गार वारा .,
चहू-कडल्या गर्दी मधेही , शोधू लागतो तुझा चेहरा .,
मग त्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये ., तूच  " तू " दिसते .,
खरच सांग ना ग ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

आपल्या जवळच्या नात्यांमध्ये ., वाढत असतो दुरावा .,
पण तू सोबत असता ., श्वास घेत असे मी मोकळा .,
सर्व दुरावले देखील तेव्हा ., तूच जवळची असते .,
अस का होत ., कोणास ठाऊक ., हेच ते " प्रेम " असते .. ??

खरच सांग ना ग वेडे., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

अक्षय भळगट
१७. ०१. २०१५

Dnyaneshwar ulage

काल कोवळ्या फुलांचे
जिथे ताटवे नटून आले,
त्या लाजऱ्या मोगऱ्याला
आज काटे कोठुन आले ||धृ||

प्रेमाचा हा खेळ रानी
एकट्याचा डाव नाही
दोष असेल अधीक माझा
पन तुही अगदीच साव नाही||१||

तुझ्या जीव घेण्या बेवफाईचा
मला तीऩटळमात्र राग नाही
जळेल अजन्म मी तुझ्यासाठी
पन ह्रदयात आग नाही||२||

अधीक माहीतीसाठी:
८१४९ १२ ७३३६
Ulage.D.D.