खेळ प्रेमाचा.....॥

Started by Vaibhav Jadhav VJ, January 19, 2015, 11:52:24 AM

Previous topic - Next topic

Vaibhav Jadhav VJ

कवितेचे नाव :-  :खेळ प्रेमाचा.....॥
कवी :- वैभव यशवंत जाधव.

करुनि ओळख तुझ्याशी
नंबर दिला तू मला,
पाठवता मँसेज
प्रेम झाले मला अन् तुला.

नाही राहिली तू मजविना
नाही राहिलो मी तुझविना,
घे तू सांभाळून स्वत:ला
अडला जीव या मना.

फिरलो खुप लांब-लांब
बोले मन क्षणभर थांब,
नाही विचार मला कुणाचा
केली मी पैशांची उलाढाल.

झाली हौस तुझी पूरी
म्हणुनि मला तू विसरली,
भेटला तुला दूसरा कुणी
म्हणुनि माझ्याशी तू रूसली.

का दिलास तू मला धोका ?
का केलास तू खेळ प्रेमाचा ?
दिसते तू, तो दिवस महत्त्वाचा
मग,का केलास तू अंत जीवनाचा ?.

जाणिले मी तुझे मन
जाणिले मी तुझे ते स्वार्थपण,
तोडिले तू माझे मन अन्
म्हणतेस जा तू ते विसरुन.

तोडू नकोस मन माझं
सोडून जाऊ नकोस तू असं,
अपूरे तुझविन जीवन माझं
जगण्यासाठी ठेवू नकोस मला एकटं.

तुझ्याचसाठी होतं माझं जीवन
आता काय करू मी जगून,
प्रेमासाठी यावे मला मरणं
म्हणुनि घेतोय स्वत:ला फासून.

खरं प्रेम होतं माझं
आता असेल तुला कळालं,
चेहरयावर जरी असेल हास्य
आता मन असेल तुझं रडालं.........॥