शेवटचे बोल तुझे ......

Started by राम पाटील (स्मित), January 19, 2015, 11:22:33 PM

Previous topic - Next topic

राम पाटील (स्मित)

प्रेम  एक नाजूक  भावना, मनाच्या  हिंदोळ्यात  झुलणार  एक आनंदाई  झोका..
        ज्याला प्रेम  मिळाले  तो जगातला  सुखी  माणूस  असे  मी तरी  म्हणेन .तिच्यासाठी  झुरणे ..तिच्यासाठी  मरणे ...सगळे काही  तिच्यासाठी ...दिवसातील  सर्व  दुखे  बाजूला  सारून  तिच्या  बाहुपाशात  विसावणे ...आणि दुखे  विसरून जाणे..... ,काय  ताकद  असते  या प्रेमात कोण  जाने ...आयुष्य  उभारायला लावते ते  प्रेम ...आणि नाही  मिळाले  तर .................
                         तर  आयुष्ययाची  वाताहात  करायला  लावते ते  प्रेम . जगण्याची  इच्छा  मरून  जाते ..जीव  नकोसा  होतो. जिने  स्वप्ने  बघायला  लावली तिनेच स्वप्ने  मोडली  म्हणून           रडत  बसावे  लागते .
खरच  इतके  प्रेम  कराव का कुणावर ..पहावीत का स्वप्ने ....जोडावी  का नाती...भीती  वाटते ...पुन्हा  नव्यान  जगायला .. आठवणीत  झुरून  मरायला .....त्यातल्या त्यात तिने  जगासमोर आपल्याला  फसवल्याचा ....
    मी  पण केल प्रेम ...सगळी  नाती  तोडून......जीवापाड  केल..एक  प्रेमवेढा म्हणून ...आयुष्यातील  चार  वर्ष  घालवलीत  तिच्यासाठी ....ती  चार  वर्ष  आठवलीत  तर आजूनही  हृदयाच्या  कोपऱ्यात गुदगुल्या  होतात. पण  त्या नंतरचे  वर्ष  आठवले कि हृदयाचा  चुराडा होतो .माझ्याच  समोर ...माझ्याच प्रेमाचा  लिलाव  मांडला  होता  तिच्या घरच्यांनी .. प्रेम ..लव्ह ..या  संकल्पनाच  मोडीत काढल्या  होत्या त्यांनी... कमी शिक्षणासाठी नाकारणाऱ्या या माणसाना प्रेमाची  किमत  काय  कळणार...लग्नाच्या आदल्या  रात्री माझ्यासाठी  रात्रभर  रडणाऱ्या तिच्या  वेदना घरच्याना काय कळणार ...
जाताना  ती  म्हणाली  विसरशील कारे मला .....आणि शेवटचे  तिचे  वाक्य  आठवते...प्रेम  केलस ना  माझ्यावर ..मग  मला सांग ज्याच्यावर  आपण  प्रेम  करतो  ती व्यक्ती  सुखी  राहावी  आनंदात  राहावी ..आणि  सुखाने  जगावी ..इतकच  ना  रे ..शरीराने  जवळ  येणे  याला  प्रेम  नाही  म्हणत ..मी  कीतीही  दूर असले  तरी  माझे  पहिले  प्रेम  आहेस. आणि  तुला  विसरणे  कधीच  शक्य नाही रे नात्याचा प्रेमाचा  नाही  विचार  करणार  रे ही माणसे....दगडाचे काळीज  आहे  रे याचं..... स्मित  .... क्रमश
:'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'(