शापित जन्म

Started by मी, January 20, 2015, 02:07:45 PM

Previous topic - Next topic

मी

शापित जन्म घेते
परके धन म्हणून जगते
उपरी स्वतःच्या दारी
लग्न करोनी दुसऱ्या घरी जाते
माया प्रेम आब्रू तीच सांभाळते
वासनागंध नजरा, पुरुषीपणाच्या
नावाखाली खपवून नेते
शिकार होता तिची
म्हणतात तिचेच कपडे तोकडे
भक्श दिसता समोर उघडे
वाघ तोडेल लचके.
देवी सारखी पुजतो
समाज तिला 
प्रतिकाराचा अधिकार
मात्र नाही दिला.
अजून किती देणार तिला
स्त्री म्हणुनी शिक्षा
तिला देखील असेल
एका प्रेमळ हाकेची प्रतीक्षा
गरज आहे कृष्णा तुझी
या धरती वरती पुन्हा
कर्णापेक्षा द्रौपदीला
कवच कुंडले देना.

विकास

गरज आहे, कृष्णा, तुझी
या धरती वरती पुन्हा
शेकडो विविध तर्‍हांनी!

Çhèx Thakare