दुःखाचा आस्वाद

Started by Rajesh khakre, January 21, 2015, 05:02:26 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

दुःखाचा आस्वाद

जुनीच ओळख
दुःखाशी ती माझी
सुख नोहे राजी
यावयाला

दुःखाचा तो भार
घेण्या पाठीवर
सदैव तत्पर
राहतसे

दुःख तो सोबती
मैतर जीवाचा
पाठ ना सोडी
कदापिही

नाही भरवसा
कधि त्या सुखाचा
स्तायित्वाच्या त्याच्या
नेम नाही

सगा सोयरा तो
दुःख एक माझा
आणिक जीवाचा
कोणी नाही

येवोत कितीही
दुःखाचे ते धुके
मन ना ते सुके
कोमेजून

नाही ही तक्रार
दुःखाची ती माझी
झालो आहे राजी
जगण्या ते

उगी का रडावे
दुःखाच्या त्या भेणे
चोखंदळ जगावे
दुःखासहित

देवा मी ही तुझा
किती तो आभारी
जगण्याची उभारी
दुःखासवे

दुःखास मानतो
तुझाच प्रसाद
त्याचाही आस्वाद
प्रेमभरे

दुःखाशी ती इतकी
झालीसे सलगी
तेची आता वाटे
सुखरुप

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com