व्यथा एका आईची

Started by Vedanti, January 26, 2015, 10:24:53 AM

Previous topic - Next topic

Vedanti

लोळताना -खेळताना, हसताना-गाताना,
आठवतो रे तू मला मिरवताना....

आला तू पदरात माझ्या जेव्हा,
आनंद गगनात मावेनासा होता रे माझा तेव्हा ....

रागवायची-शिकवायची नि खेळवायची तूला,
कुशीत घेऊन निजवायची तूला....   

कुठे हरवलायस रे माझ्या बाळा,
रागावलायस माझ्यावर नि झाला आहेस ना वेगळा ?

तुझी वाट पाहून थकले रे मी आता,
जीव झाला आहे कासावीस आता....

नको ते ऐश्वर्य नि नको अशी संपदाही,
ज्यात दिसणार नाहीस तू नजरेला एकदाही....

वेदांती आगळे
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]

Çhèx Thakare



Vedanti

[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]