घर (५ + ७ + ५)

Started by केदार मेहेंदळे, January 28, 2015, 09:19:15 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

तुटली नाती
न राहिला जिव्हाळा
तुटले घर

बंध तुटले
कोणीच ना कुणाचे
फुटले घर

भिंती केवळ
परकेच सगळे
नुरले घर

जगणे आता
व्यवहार केवळ
कुठले घर?

शोध स्वता:चा
फिरतो दश दिशा
सुटले घर

केदार...

Çhèx Thakare

मस्तच केदार दा ...  :) :)