माणसं शिकली.

Started by Sachin01 More, January 29, 2015, 12:33:21 AM

Previous topic - Next topic

Sachin01 More

माणसं शिकली.
पुस्तक खरडुन पैशात राहुन माणसाला विसरली,
अहो काय तर माणसे शिकली.
आजही माणसा-माणसांत भेदच करु लागली,
कळ्या उमलन्या अगोदरच खुडु लागली,
माणसातली दरी वाढतच गेली,
अहो काय तर माणसे शिकली.
धर्म आणि प्रदेशा मुळे पुन्हा अद्न्यानाच्या खाईत गेली,
अक्कलेच्या नादामध्ये माणुसकी विसरली.
आई-वडिलांना बाहेर हाकलून,
साहेब मंडळी बंगल्यात गेली,
मुलां-बायकोच्या नादात भावडांना विसरली.
म्हणे काय तर माणसे शिकली.
विद्न्याने माणसे आकाशातही उतरवली,
स्वार्थाविना कोणी मनात नाही उतरली .
माणुसकीला विसरुन पैशाने शहाणी बनली,
मोठ्ठ बनलेल्या खोट्या पडद्याआड हि माणस काय बर शिकु लागली.
Moregs