कोडे

Started by djyashwante, January 30, 2015, 05:55:59 PM

Previous topic - Next topic

djyashwante

नभात घिरट्या मारून थकलो
काय करावे सुचेना ...
काय बर मी शोधीत होतो,
माझे मलाच समजेना !

आजवर ना घडले कधी
काय हरवले कळेना ...
संभ्रमात मी पडलो असा,
उत्तर काही मिळेना !

सुटता सुटेना प्रश्न हा
उलगडा काही होईना ...
काय लागले वेड असे,
हा विचार मनातून जाईना !

कोडे हे सुटले शेवटी
जीवनाशी होता तो सामना ...
मलाच मी शोधीत होतो,
काय म्हणावी ही भावना !


कवी - दिपक यशवंते "मैत्रेय"
९८१९९७८०९०