दुनिया

Started by गणेश म. तायडे, February 01, 2015, 08:35:47 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

रसरशीत चमचमीत दुनिया,
नशीली बेधुंद ही दुनिया...

प्राशुनी विसरतात सुख दुःखे,
अशी ही जहरीली दुनिया...

एक प्याला नशेचा ओतुनी,
विसरतात सारी नातीगोती ही दुनिया...

रसरशीत चमचमीत दुनिया,
नशीली बेधुंद ही दुनिया...

मरणाच्या दिशेने हसत हसत,
हात धरून गेली ही दुनिया...

नको असली ही दुनिया,
उध्वस्त करते ही दुनिया...

रसरशीत चमचमीत दुनिया,
नशीली बेधुंद ही दुनिया...

पोरकी झाली लेकरे सारी,
घरे जाळूनी गेली ही दुनिया...

शौकाचे एक विद्रुप रूप,
भयभीत करून गेली ही दुनिया...

रसरशीत चमचमीत दुनिया,
नशीली बेधुंद ही दुनिया...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com