पीक झाले पसार

Started by sanjay limbaji bansode, February 02, 2015, 01:12:58 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

यंदा साऱ्या पिकांने
असे केले बेजार !
येण्या आधीच सारे
पीक झाले पसार ! !

लाडाची  मूंग  बाई
मागित होती वीऱ्या खाऊ
दिला तिला पोट भरून
रुसला मंग पाऊस भाऊ
पाऊस भाऊचा येण्या पून्हा
दिसेना आकार !
येण्या आधीच सारे
पीक झाले पसार ! !

फिरवली सोयाबीनने नजर
रडलो तिच्या पुढं ढसा ढसा
पेरली होती खंडीभर
हाती आली पसा पसा
एकुलती एक सोयाबीन होती
तिने बी केले बेजार !
येण्या आधीच सारे
पीक झाले पसार ! !

ज्वारीने तर कमालच केली
उभ्या उभीच मरून गेली
होते नव्हते तिच्यातले दाणे
उपाशी पाखरानीं घरट्यात नेली
काढण्या आगोदरच सारी ज्वारी
पाखरे घेऊन झाली पसार !
येण्या आधीच सारे
पीक झाले पसार ! !

पोळा दसरा दिवाळी
सणानी लावली वाट
कष्ट करतो रोज मरतो
जेवायला मात्र रिकामे ताट
मांगु कुणाला उसने
माझ्या सारखेच माझे शेजार !
येण्या आधीच सारे
पीक झाले पसार ! !


संजय बनसोडे
9819444028