Started by Aishu, February 06, 2015, 06:28:52 PM

Previous topic - Next topic

Aishu


कलमातील कागदावर उतरवावी ती शाई
कधीतरी प्रेमाने लिहावा
शब्द तो "आई"

आजारी असता आपण
बिलगुनी राहते ती आई
तिचे आपुल्यावर तितकेच प्रेम
जसे गोठ्यात चाटे वासराला गाई

जग जिच्यामुळे पाहतोय
ती म्हणजे आपुली आई
मऊ,मखमली जशी
पांढर्याशार दुधावरील साई

किती सांगु तिच्या मी कथा
जे ना जाती कधी ही व्यथा
महान व्यक्तीमहत्वच जणु आई
जी सांभाळते पिल्लांना होऊन बाबा साई..

®:-ऐश्वर्या सोनवणे..
मुंबई..