व्यथा

Started by धनंजय आवाळे, February 10, 2015, 12:55:04 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

मनातली व्यथा जेंव्हा आभाळात दाटून येते
विजेच्या रूपाने  हृदयात चमकून जाते
पापण्यांची पाने तेंव्हा आपोआप सळसळतात
मनातले नि आभाळातले ढग एकसाथ गळतात

छातीत ली कळ सरीतून उमटू पहाते
गढूळलेली वेदना पावसात भरून वाहते
रापलेली दुःखे सारी गालावर ओघळतात
मनातले नि आभाळातले ढग एकसाथ गळतात

आशेच्या वाटेवरती निराशा फिरकू लागते
भिजलेली नजर देखिल कोरडी होउन पाहते
पाण्याचे थेंब जखमा होउन भळभळतात
मनातले नि आभाळातले ढग एकसाथ गळतात