आई

Started by Pravin Raghunath Kale, February 10, 2015, 06:21:02 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

आईची असते दुनिया न्यारी
आपली मुले तीला सर्वात प्यारी
तिथे नसतो काळा गोरा
मुलगा मुलगी नसतो तिथे भेदभाव
सर्वाना प्रेम देते समभाव
कितीही आली दुःखे संकटे
घरात नसे कण दाण्याचा
स्वतः ती राहीलउपाशी
पण तिचे प्रेम म्हणते
आपला बाळ खाईल तुपाशी
तिच प्रेम आमच्यावर नितांत
अन् निस्वार्थ
यातच तिचा घडतो परमार्थ
देवापेक्षाही कमी नाही
तिचे ते रूप
तिच्या त्या प्रेमाने
सारेच होतात भावूक
मायंच प्रेम असचं असत न्यार
सर्वाना हवहवंस प्यार

कवी :- प्रसाद प्रदीप देशपांडे
मो. : 8381068971