संध्यासमयी

Started by धनंजय आवाळे, February 11, 2015, 11:31:49 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

संध्यासमयी मला तु आठवतेस
जुन्या दिवसांना पुन्हा भेटवतेस

निसटलेले काही पुन्हा गवसू पाहते
सुकलेले झरे पुन्हा होती वाहते

आठवांच्या सरी करती मज चिंब
पानावर दवाचे पुन्हा  साचतात थेंब

सुकल्या पाकळ्यांना पुन्हा येतो गंध
तुझे माझे पुन्हा जुळतात बंध

संध्यासमयी पुन्हा मन कावरे बावरे
नसताना ही संगे मागे तुच उरे


मिलिंद कुंभारे