अरे ती गेली

Started by deepeshkale, February 12, 2015, 11:17:58 AM

Previous topic - Next topic

deepeshkale

             
                  अरे ती गेली

अरे ती जातेय , अरे अरे ती गेली .
रूंधलेल्या गळ्याने , निरोप घेउन ती गेली

हुंदके देत अश्रु पुसत ती गेली .
सगळे प्रश्न अनुत्तरीत ठेवून ती गेली .

प्रेम मलाही होतं आणि तीलाही, प्रश्नांची उत्तरे शॊधतच होतो आणि तीने जाण्याचा निर्णय घेतला .
काय चुकलं हे मलाही समजलं नाही आणि तीलाही उमगल नाही ?
प्रश्नांच आेझ मनावर ठेवून ती गेली .

मीठीत घेउन, हा धागा तोडण्याचा निर्णय घेउन गेली.
जग खरंच गरगर फिरतय , ह्याची जाणिव
करून देऊन गेली .अरे ती गेली .

खरंच मी कुठेतरी कमी पडल्याचा , आयुष्यभर भार देऊन गेली .
धागा तुटलेल्या पतंगा प्रमाणे , जगणं बनवून गेली .
जीवनाला ऒसाड पाडून,अशीच ताटकळत ठेवून गेली.
अरे ती गेली.

आठवणींच्या पुस्तकात ,इतिहासाचा धडा गीरवून गेली .
मीठी सैल करत , हातातला हात दुर सारत, गाल पुसत गेली .
अरे वेडया स्तब्ध का? ती गर्दीत दिसेनाशी झाली.
अरे वेडया, भानावर ये. खरंच ती तुला सोडुन गेली .


दिपेश काळे .