पिकलं पान

Started by गणेश म. तायडे, February 13, 2015, 10:21:54 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जिवनावर प्रेम करत करत तारूण्य ओलांडले,
मात्र आता तर मला या म्हतारपणाने गाठले...
आयुष्यभर मी जगाशी साहसाने लढत राहिलो,
बाभूळाप्रमाणे हवा, ऊन, पाऊस सोशित राहिलो...
पण मात्र आता नाही उरली ती हिम्मत साहस,
जणू या म्हतारपणाने केले मला निरागस...
वडाच्या वृक्षाप्रमाणे खंबिर उभा राहिलो,
पण मात्र आता पिकली पानं अन् बेसहारा झालो...
आता उरले नातवंडांना गोष्टी सांगायचे एकच काम,
गाण्याऐवजी असते आता मुखात प्रभु रामाचे नाम...
आयुष्यभर मी स्वतःने कितीतरी कमावलं,
अन् या म्हतारपणी मी ते धैर्य गमावलं...
अशा तऱ्हे ग्रंथेचे अध्याय पुर्ण होत आले,
म्हणून तर पिकली पाने आता पिकली पाने...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com