स्वधर्म पहिजे

Started by sanjay limbaji bansode, February 13, 2015, 03:42:46 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

पोटाला पोट भरून देईल ती जात पाहिजे
जीवनभर भरवसा ठेवील तो हात पहिजे
विश्वासाचा धागा जपणारी साथ पहिजे
आयुष्यभर सोबत जळणारी वात पाहिजे

माणुसकी हा माणसातला मज देव पहिजे
पाप होण्याआधी घाबरवणारे मना भेव पहिजे
वाईट होण्याआधीच मेंदूला चेव पाहिजे
इभ्रतिला जपणारा डोक्यावर शेव पाहिजे

समोरच्याला ओळखणारे मन पाहिजे
दुश्मनालाही प्रेमाने जिंकणारे रण पहिजे
जात पात न मानणारे सारे जन पहिजे
दया शांती करुणा हेच सर्वां धन पहिजे

आई वडीलांची सेवा करणारा धर्म पहिजे
दिनदुबळ्याची सेवा करणारे कर्म पहिजे
जाती जातीला जोडणारे मर्म पाहिजे
शिकून संघटित होणारा स्वधर्म पहिजे


संजय बनसोडे