पून्हा पून्हा ...

Started by श्री. प्रकाश साळवी, February 13, 2015, 09:21:19 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

पून्हा पून्हा..
का करतो मी तोच तो गून्हा?
शब्दांनी फटकारले कितीदा तरी पुन्हा
वाळूत बांधली मी घरे स्वप्नातली
का पाहतो तरीही ती स्वप्ने पुन्हा?
नात्यात गूंफले मी धागे रेशमाचे
तकलादू नाती का जोडतो मी पुन्हा?
चालून जाता ढेपाळलो कितिदातरी
वेदना ऊराशी घेऊन का चालतो पून्हा?
करता चांगले कुणाचे तोंडास काळे लागले
चांगले करण्याचा तरीही ध्यास का पून्हा?
मागे वळून पाहता भासला भकास भूत तो
सोनेरी भविष्याचा वेध का घेतो पून्हा?
पाजले क्षिर तरीही गरळ तो ओकला
दंश त्याने केला तरी भला का वाटतो पून्हा?
शोधता सूख ते दूःख किती मी भोगले
पण सुखाचा शोध का घेतो मी पून्हा?
श्री.प्रकाश साळवी