प्रेम

Started by Anil S.Raut, February 14, 2015, 03:25:48 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

प्रेम कर असे कि
ओठावर येता नाव तुझे
जगण्याची इच्छा प्रबळ व्हावी...
कोण ते हीर-रांझा
कसे ते लैला-मजनू
हार त्यांच्या प्रेमाची विसरुन जावी!

प्रेम कर असे कि
एक ह्रदयपाकळी तुझी,
एक तिची-मिळून कळी व्हावी
श्वासा-श्वासाचे घालून पाणी
विश्वासाचे मोल जपुनी
रोज कळी फुलत रहावी !

प्रेम कर असे कि
नजरेतील नफरत दुनियेच्या
तुझ्या प्रेमात विरघळून जावी...
प्रियेच्या सुखाला पुन्हा
चुकूनही कधी चुकीने
त्यांची नजर न लागावी !

प्रेम कर असे कि
चिरकाल व्यापुनसुध्दा
जागा नेहमी कमी पडावी...
सागराची खोली
आकाशाची ऊंची
तुझ्यापुढे खुजी वाटावी!

*अनिल सा.राऊत*
9890884228


Anil S.Raut