विश्वास कसा ठेऊ ??

Started by Prasad.Patil01, February 15, 2015, 07:30:28 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

चेहऱ्यावरी रे ज्यांच्या, सदा गोड हसू असतं...
हसण्यावारी रे ज्यांच्या, हे  जग हि सार फसत.
एकट्यात मी अशांना, रडताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

होती जपित लोक, जी स्नेह-प्रेमधन...
जे त्यागी सारे काही, फक्त ठेवाया रे मन...
अहमात नाती त्यांना, तोडताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

वचने दिलीत ज्यांनी, साथाची अशी लोक...
येत प्रसंगी सारी, मरणारीही ही लोक...
संकटात भीतीपोटी, पळताना पाहिली मी..
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

जगताना आयुष्यात, आधार ज्यांचा होता...
ज्यांच्याचसाठी त्याचा, रे जीव सारा होता...
त्याच्याच पाठी सुरा, घोपताना पाहिलं मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

घाबरे रे मन माझं, कुठे आता जाऊ...
विश्वासघाती सारे इथे, विश्वास कसा ठेऊ...
स्वार्थात कित्येक घात, होताना पाहिले मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

अरे माणसच माणुसकी, सोडताना पाहिली मी...
हे सर्व माझ्या डोळ्यांनी, घडताना पाहिलं मी...

                               -     प्रसाद पाटील
                                    (स्वलिखित)