ऋतुराजा

Started by धनंजय आवाळे, February 16, 2015, 12:18:22 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

मेघ भरले आभाळ
ओली सर भुईवर
भिजलेला मृदागंध
होइ वरयावरती स्वार
   
हवा कुंद नि दमट
ओली निसरडी वाट
शुभ्र धुक्यात हरवले
डोंगरमाथ्याचे घुमट

स्वच्छ नितळ पाण्याचे
वाहते झाले पाट
काळ्या आसमंती
होइ विजांचा गडगडाट

आला पाऊस भिजत
ऋतुराजाच्या थाटात
अंकुरते बीज
भुमातेच्या पोटात