देवा तू आहेस कि नाही

Started by SHASHIKANT SHANDILE, February 16, 2015, 04:31:53 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
माणूस उपाशी मरतोय पण तुला लाडूचा भोग आहे
माणसाला खायला पोळी नाही पण तुझ्या आंघोळीला दुध आहे
म्हणायला तुझं मंदिर आहे पण मंदिरात तूच न्हाय
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

माणसाला तू बनवलं मग  हा कुठला न्याय आहे
एका हाती चांदीची थाळ दुसऱ्याच्या माथी कष्ट अपार आहे
मानलं कि कर्म सर्वोपरी पण कर्म कराया कुठाय हात
कुणाला डोळे नाही कुणाला हात नाही कुणाला नाही पाय
सांगणा तूच त्यांच्यासाठी काय-काय केले उपाय 
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

तूच घडविली श्रुष्टी सारी मग दोषीही तूच आहे
कुणाला बंगला कुणाला गाडी कुणाच्या डोक्यावर छतच नाही
माई बाप मुलाला रस्तावर सोडत नाही पण तू हे पाप केलं
करता धरता बनला नाही मग जन्म माणसाला का दिलं
कष्ट तर तोही करतो पण त्याच्या कष्टाला मोल नाही
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

का  मी तुझी  पूजा करू का तुला मंदिरात विनवू मी
माझे कर्माचे फळ हेच आहे तर का तुला भोग चढवू मी
तुझी मायाहि त्यांच्यावर, तुला देतात सोन्याचे ताज जे
मी करेन मी  जगेन मीच माझं बघून घेईन
पण आता तुझा दरवाजा  ओलांडणार नाही मी 
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

शशिकांत शांडीले (S D), नागपूर
Mo. ९९७५९९५४५० 
Its Just My Word's

शब्द माझे!