तो एक कवीच आहे....

Started by Aishu, February 18, 2015, 12:00:55 AM

Previous topic - Next topic

Aishu

*तो एक कवीच आहे*



तो एक कवीच आहे
जो माझ्यावर खुप भाळलाय
माझ्या सौंदर्यावर माझ्या लांबसडक केसांवर
त्याच्या मनचं पाखरु उडतय माझ्यावर


तो एक कवीच आहे
जो पाहतोय स्वप्न आयुष्य माझ्या संगतीनं जगायची
सतत ओढ असते त्याला माझ्या एका मिठीची
मला म्हणतो हो माझी, बनवुन ठेवेन राणी तुला माझ्या ह्या ह्रृदयाची


तो एक कवीच आहे
नातं म्हणतो किती छान कवीमनाचे जुळेल एकमेकांशी
वाटतं त्याला पांघरावी शाल मी त्याच्यावर हिरवळ प्रेमाची
लाव म्हणतो ओठ ओठांशी पसरुदे लाली ओठांची

तो एक कवीच आहे
जो जीवापाड करतो प्रेम अनं झुरतोय माझ्यासाठी
भावना त्याच्या उसळतात तो लिहीतोय माझ्यासाठी
म्हणतो मला आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ देईन हो माझी तु माझ्यासाठी...



हे सर्व माझ्याशी बोलणारा ......तो एक कवीच आहे...तो एक कवीच आहे...



®ऐश्वर्या सोनवणे...मुंबई..ऐशु..Aishu..... 
(क्रृपया कवीते खालील नाव न काढता..कवीता पुढे पाठवावी) 

shweta Rakesh sathawane

 :-\Ashwarya your poem is to much nice......

nitinkumar

तुझ्या कवितेचा आशय खूप छान आहे परंतु कविता करताना कवितेची "बांधणी" नीट असायला हवी जेणेकरून रसिकांना त्या आशयाचा कवीतेच्या रुपात आनंद घेत येईल. अजून लिहित जा...- नितीन माने

Vijay Waghmode

Aishwarya : तू शब्द बांधणी कडे जरा पहावं, कवितेचा आशय अति सुंदर. यमक आणि अलंकार दोन्ही उत्तम रित्या वापरता येऊ शकतात

सोनाली

®ऐश्वर्या सोनवणे...मुंबई..ऐशु..Aishu.....
(क्रृपया कवीते खालील नाव न काढता..कवीता पुढे पाठवावी) 

ही अप्रतिम कविता कवितेखालील नाव न काढता ज्ञानपीठ पुरस्काराकरता कोणीतरी ज्ञानपीठाकडे पाठवावी.