"काल पहाटेच स्वप्न"

Started by nitinkumar, February 20, 2015, 02:38:01 PM

Previous topic - Next topic

nitinkumar

"काल पहाटेच स्वप्न"
हात तुझा हातात घेऊन
डोळ्यात डोळे घालून पहायचंय
काल पहाटेच्या स्वप्नाला
मला जिवंत करायचंय

वाटते कधी कधी
तुझ्या स्पर्शात हरवून जावं
नदी काठी कुशीत घेऊन
डोळे मिटून पडून राहावं
तुझ्या प्रत्येक शब्दावर
मला प्रेम करायचंय....
काल पहाटेच्या स्वप्नाला
मला जिवंत करायचंय

जावं तुला घेऊन
शांत सूर्यास्त पाहण्यास
समुद्राकाठी घेऊन
रासलीला करण्यास
तुझ्या हसण्यातल्या गोडव्याला
नजरेत साठवून ठेवायचंय....
काल पहाटेच्या स्वप्नाला
मला जिवंत करायचंय

तू म्हणशील ते सुख
तुझ्या पदरात टाकायचंय
दिल्या-घेतल्या वचनांना
मला पूर्ण करायचंय
माझ्या आयुष्यात मला
तुझा रंग भरायचाय....
काल पहाटेच्या स्वप्नाला
मला जिवंत करायचंय


- नितीनकुमार