"गुलाब"

Started by nitinkumar, February 20, 2015, 02:51:21 PM

Previous topic - Next topic

nitinkumar

"गुलाब"

गंध फुलांचे आसमंतात प्रहरी
रंग प्रेमाचे प्रीतीत बुडाले

खुलले निखळ हास्य,  तुझ्या चेहऱ्यावरी
भ्रमर ते फुलांतून अलगद उडाले

ध्यानी-मनी मज प्रिये, अन
स्वप्नातूनही आता,
मनाला मनातले गुपित कळाले!

पद्मातीत भ्रमर... आणि पारिजात का जळाले?
उमलल्या रातराणी, चांदणे हि जाहले
प्रेम रसात ते काजवेही नहाले
न उलगडे रहस्य तव अदांचे....प्रिये
तुझ्या केसांतले गुलाब का गळाले?



- नितीनकुमार