"प्रेयसी कशी असावी?"

Started by nitinkumar, February 20, 2015, 03:01:24 PM

Previous topic - Next topic

nitinkumar

"प्रेयसी कशी असावी?"

प्रेयसी कशी असावी? राई एवढ्या हृदयात आभाळाएवढे प्रेम करणारी
प्रेयसी कशी असावी? दिलेल्या छोट्या वस्तुंविषयी अभिमान असणारी
प्रेयसी कशी असावी? त्याच्या ध्येयात तिचं ध्येय पाहणारी
प्रेयसी कशी असावी? अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
प्रेयसी कशी असावी? दुःखाश्रुतून आनंदाश्रूकडे नेणारी
प्रेयसी कशी असावी? वयोवृद्धांची निःसंकोच सेवा करणारी
प्रेयसी कशी असावी? मॅकडोनाल्ड पेक्षा पाणीपुरी एन्जोय करणारी
प्रेयसी कशी असावी? क्षितिजापलीकडे जाऊन विचार करणारी
प्रेयसी कशी असावी? उत्तुंग महत्वकांशा निर्माण करणारी
प्रेयसी कशी असावी? राई एवढ्या हृदयात आभाळाएवढे प्रेम करणारी....


- नितीनकुमार