"ऋण शब्दांचे काही"

Started by nitinkumar, February 20, 2015, 03:42:31 PM

Previous topic - Next topic

nitinkumar

"ऋण शब्दांचे काही"

व्यथा माझ्या मनाची तुला कळणार नाही
मी तुझा, तू माझी कधी होणार नाही
कळले तुला बंध रेशमांचे चुकुनही
मी आयुष्यात तुझ्या पुन्हा येणार नाही

नको मज पुन्हा तो स्वप्नमहाल
आणि, नकोत स्वप्नकुंडातली फुलेही
मी असाच होईन स्वच्छंद कुठेही
करुनी मंद, हृदयातली स्पंदने ही

राहिले मजकडे शब्द आसवांचे
या शब्दांस अर्थ उरलाच नाही
फेडीन तरी ऋण शब्दांचे काही
राहिल्या शब्दांचे बंध असणार नाही

मी जरी पेटविल्या स्वप्नगुंहेच्या मशाली
अंधःकार मनाचा संपणार नाही
पहा विचारून हृदयास काही
कळेल, मी कोणाचा उरलोच नाही


- नितीनकुमार