दाभोळकर सारखेच गेले पानसरे

Started by sanjay limbaji bansode, February 21, 2015, 12:56:52 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

दाभोळकर सारखेच गेले पानसरे
पुरोगामी विचारवंत येथे असाच मरे

फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचा झाला पुन्हां खून
सरकार मात्र आपलं गप्प बसलय, सारे बघून

जिंकली येथे पुन्हां सनातनी विकृती
उदयाला येत आहे पुन्हां येथे मनुस्मृती

लक्षात ठेवा तुम्ही आमच्या विचारांना मारल तर
एक गेला तरी हजारो तयार होतील पानसरे, दाभोळकर

जेष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली


संजय बनसोडे