सनातनी वारे

Started by sanjay limbaji bansode, February 23, 2015, 12:50:05 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

दाभोळकर गेले पानसरे गेले
मरती पुरोगामी सारे
कालही होते आजही आहे
येथे सनातनी वारे !!

मनायला तर कुणीच नाही
पाहिले तर सारेच आहे
थोडीही देवावर टीका झाली
गिळायला त्याला घारच आहे
रंगी बेरंगी झेंड्यातून
विद्रोह करती सारे !
कालही होते आजही आहे
येथे सनातनी वारे !!

नको आम्हां वीज्ञानवादी विचार
बरे ते अंधश्रद्धेचे जोखड
कुणा मिळे आशीर्वाद
कुणा मिळे रोकड
प्राणीही येथील समजुतदार दिसती
माणसे मात्र न्यारे !
कालही होते आजही आहे
येथे सनातनी वारे !!

करोडोचे दान मिळे मंदिरी
आम्हां आणखी पाहिजे काय
श्रद्धाळु मर मर मरे अंतरी
पुजारी मात्र खाती साय
सर्वच वाहतात येथे
मनुवादी विचाराचे भारे !
कालही होते आजही आहे
येथे सनातनी वारे !!


संजय बनसोडे