टेबलाखालून

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 25, 2015, 10:25:53 AM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

कार्यालयाच्या रांगेत
मी थकून थकून बसलो
टेबलाखालचं पाहिलं
अन खुदकून हसलो

समोरच्या आरश्यात
माझेच मला दात दिसले
मीच पूर्वी लालचावलेले
माझेच मला हात दिसले

पूर्वी नेहमी नेहमी
मी टेबलाखालून देत गेलो
फुकटातलेच कामं
पैशाने करून घेत गेलो

याच माझ्या आदतीने
धुंदरलय राजकारण
तिळाएवढ्या कोलतीने
केलंय उग्र रूप धारण

हीच कोलती आज
सर्वत्र पळत आहे
याच भ्रष्टाचारात
आज  प्रतेक जण जळत आहे


NARAYAN MAHALE KHAROLA