आता सगळं बासं करा

Started by Pravin Raghunath Kale, February 26, 2015, 05:30:35 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

भूसंपादन कायदा आणून सरकार शेतक-शेतक-याच्या जमीनीही घेवू इच्छित आहे, त्यावर लिहलेली कविता. .
--------------------
आता सगळं बास करा. .
--------------------
झाली तेवढी पुरे झाली
अजून किती थट्टा मांडणार
आजवर लुटत आलाच आहात
आता तर जमीनीही लुटून नेणार

सांगा आता तुम्हीच
आम्ही कसं जगायचं
अन्याय होतय दिसूनही
आम्ही गप्प का बसायचं

उन्हा-तान्हात काम करून
पिकं आम्ही पिकवली
दुष्काळाचा सामना करत
तुमची पोटं भरली

भरलेल्या पोटाची तुम्हाला
जाण का नाही झाली ?
आमच्या गाळलेल्या घामाची
तुम्हाला किंमत का नाही कळली ?

आम्ही पिकवलेले धान्य
तुम्ही स्वस्तात खात आलात
आम्ही कष्ट करूनही शेवटी
आम्हालाच लुटतं आलात

एवढं तेवढं सहन केलं
आम्ही कधीच नाही बोललं
आता जमीनीही हडपणार
हे मात्र अतीच झालं

कधी थांबवणार हे सारं
जगणंच झालंय असह्य
जमीनीसोबत आम्हालाही लुटा
मृत्यूंच वाटतोय सुसह्य

आमची जळलेली प्रेत पाहून तरी
तुम्हाला फरक काय पडणार
चार दोन लाख देवून
मृत्यूचीही किंमत ठरवणार

झालंय तेवढे पुरे झालंय
आता तरी बास करा
हात जोडून सांगतोय
आमची थट्टा बंद करा
आता तरी बास करा
_____*_____*_____
कवी :- प्रविण रघुनाथ काळे
मो. :- 8308793007
दि. 25 फेब्रुवारी 2015
:::::::::::::::::::::::::::::::
कृपया कवीचे नाव डिलीट करू नये.