* सांग कशी विसरु *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 27, 2015, 12:31:02 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* सांग कशी विसरु *
सांग कशी विसरु तुला
समजत नाही रे मला
नाहीस तु या जगात
अजुनही नाही पटत मला
                      सांग कशी विसरु....
दिवस कसातरी जातो निघुन
राञ येते रडवायला मला
आसवांचे परदे दुर सारुन
पुन्हा आठवु लागते तुला
                        सांग कशी विसरु....
कारे असा छळतोय मला
विरहात तुझ्या पिळतोय मला
मला सोबत न्यायचे सोडुन
तु एकटाच कसा गेला
                        सांग कशी विसरु....
तुला काय वाटतं मी
एकट राहु देइल तुला
मी पण जिद्दी आहे
लवकरच येतेय रे सख्या
तिथं भेटायला तुला
              कारण
मी विसरुच शकत नाही तुला....
कवी-गणेश साळुंखे. ( GS ) .
MOB-7715070938