प्रेरणा तुझी

Started by kshitij samarpan, March 05, 2015, 12:26:49 AM

Previous topic - Next topic

kshitij samarpan

प्रेरणा  तुझी ,

नजरेतून नजर तुज्या ,
नजरेस  मिळवण्याची आस  आहे ,
तुझ्या सोबत प्रीत  व्हावी म्हणूनच ......
  जन्म तुझा, नि  माझा झालेला  आहे ,

तुझ्याशिवाय न सुचेल, ते विचार कसले?
ज्या विचारांत तु  नाहीस ,असे  मला सुचेल तरी कसे ?

कधी  काळी  आपण , आपलेच प्रतिबिंब
एकमेकांना  मानलेले  होते ..........
न जानो, तुझे प्रतिबिंब माझ्यापासून
आज  वेगळे होऊ  लागले कसे ?

मला  न सांगता, जे तु केलेस
ते मला  जाणवू  लागले कसे ?

तू आणि मी तर दोन  शरीर  असून ,
एकच होतो ,
तरी  अंधारात ही तू माझ्या सावलीस
वेगळे  करू  शकलीस कसे?

मनामध्ये येणारे विचार तु, मी  ,
बोलण्या आधीच ओळखणारी तू.......... ,
आज  तुला मनाचे माझ्या टुकड़े  करून,
त्यातील तुझे नाव वाचणे जमले  कसे ?

माझे नाव जरी तुझ्या कानी पडले,
तरी लाजुन  हसु फुटलेली तू,......
   माझा चेहरा ,माझी  ओळख ,विसरून तुला,
आरश्यात स्वता:ला नजर  मिळवणे  जमले कसे ?

जे काही लिहु शकलो त्याला कोणी
वाह वा ,वाह वा केले। ..........
तरी तुझ्या  मुळे मिळालेल्या
ह्या  प्रेरणेस साजरे  करू तरी कसे ?



क्षितीज समर्पण


hrishi gaikwad