शुन्य माझ्या जगात

Started by kshitij samarpan, March 07, 2015, 09:59:32 AM

Previous topic - Next topic

kshitij samarpan

शुन्य माझ्या जगात


सर्व विचार  गोठुण जातात तेव्हा
शुन्यात स्वत:ला  हरवून पाहिले मी
सर्वत्र  तर  तूच दिसतेस
मग शुन्यात राहिलो कसा मी

चेहरा आरश्यात पाहतो तेव्हा
आरसा सुद्धा दगा देतो
बंदिस्त मनाचे दार उघडून
तुझाच चेहरा दाखवत असतो


आठवणींचा तुझ्या मला
आज का ईतका उमाळा येतो
तुला न दिलेले ते पहिले पत्र
तास न तास मी वाचून काढतो

सर्व विचार जेव्हा  गोठुण जातात
तेव्हा शुन्य माझ्या जगात मी
तुलाच विचारु पाहतोय
आणखी  किती प्रतीक्षा पाहु मी

क्षितीज समर्पण

मेधा

मग शुन्यात राहिलो कसा मी

भागता एकास शून्ये
पोचशील तू अनंती सत्वरी

१/० = अनंत