आचार्य अत्रे…..

Started by Shyam, November 23, 2009, 09:29:03 AM

Previous topic - Next topic

Shyam

 आचार्य
अत्रे..... हजरजबाबी
व्यक्तीमत्व

1. स्व. राष्ट्रपती
व्ही.व्ही. गिरी यांना
आठ मुले होती.

त्याबद्दल
अत्र्यांच्या ' मराठा '
वर्तमानपत्रात बरीच
गमतीदार चर्चा होत
असायची.

अत्र्यांनी गिरी ,सौ.
गिरी आणि त्यांच्या आठ
मुलांचा फोटो प्रसिद्ध
केला

आणि त्याखाली हेडिंग
दिले
" गिरी आणि त्यांची '
काम ' गिरी "

2. कार..
अत्र्यांची परिस्थिती
जरा खालावलेली
होती. त्यात त्यांची
कार बिघडली म्हणून ते
पायी पायी कामासाठी जात

होते.
तेवढ्यात त्यांना
त्यांचा विरोधक भेटला
त्याने खवचटपणें
विचारले
' काय बाबूराव आज पायी
पायी, काय कार विकली की
काय?'

अत्रे म्हणाले. 'अरे आज
तुम्ही एकटेच? वहिनी
दिसत नाही बरोबर ?

कुणाबरोबर पळून बिळून
गेल्या की काय ?

3. " एकटा पुरतो ना ?"
आचार्य अत्रे
विधानसभेत निवडून आले
होते.

मात्र ते
  विरोधी पक्षात होते.
सत्ताधारी
कॉन्ग्रेसचे संख्याबळ
जास्त होते.

अत्रे एकटे सरकारवर
तुफान हल्ला चढवित असत.

अत्रे ग्रामीण
भागाच्या दौर्‍यावर
असतांना पत्रकारांनी
त्यांना विचारले,

' अत्रेसाहेब तुम्ही
विधानसभेत सरकारला
बरोबर कोंडीत पकडता

पण त्यांच्या
संख्याबळापुढे तुम्ही
एकटे कसे पुरणार ? "

बाजूच्या शेतातील
बळवंतरावांना
अत्र्यांनी विचारले ,

"
  बळवंतराव कोंबड्या
पाळता की नाही ? "

" तर . चांगल्या शंभर
कोंबड्या हायेत की ! "
" आणि कोंबडे किती ?"

" फक्त एक हाये "

" एकटा पुरतो ना ?"

उपस्थितांमध्ये
प्रचंड हंशा उसळला

पत्रकारही त्या हंशात
सामील झाले.

4. तुम्ही कोण रे टिकोजीराव ?
पुण्यातील एका
बोळातून अत्रे एकदा
सायकलवर चालले होते.

रस्याला उतार होता आणि
नेमके त्यांच्या
सायकलचे ब्रेक लागेनात


समोरून एका माणसाची
प्रेतयात्रा येत होती.

जाताजाता अत्र्यांचा
प्रेताला धक्का लागला
आणि प्रेत खाली पडले.

लोक भडकले.
अत्र्यांच्या अंगावर
ओरडू लागले.

तेव्हा अत्रे शांतपणे
म्हणाले,

'अहो ज्याला धक्का
लागला आहे तो काहीच
बोलत नाही

आणि आरडाओरडा करणारे
तुम्ही कोण रे
टिकोजीराव ?'