क्लेश

Started by गणेश म. तायडे, March 19, 2015, 03:19:05 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

फाटली धरती तव
आभाया आग लागली...
धावती सैरभैर
प्राण्यांना चाहूल लागली...
ग्रहण भास्करी लागले
काळोख उजेडात पडला...
दिपकाच्या प्रकाशात
मानवास शोधू लागला...
झिजली काळी आई
संतप्त रवि ठाकला...
मानवाची जात कुठली
निसर्गाचा तोल सुटला...
घेणे-देणे काहीच ना
जिवनाचा मुल्य घटला...
विकाया बाजारी सारे
संस्कार खुटी टांगला...

- गणेश म. तायडे
   खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com