मैत्री

Started by sachinikam, March 20, 2015, 09:42:44 AM

Previous topic - Next topic

sachinikam

मैत्री

उमलती कमलपुष्पे रवीच्या उदयाने
उचंबळतो अथांग सागर शशीच्या सहवासाने
न सांगता उमटती भाव मनातले नेत्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री

आवडीने पोहे कृष्ण सुदाम्याचे खातो
हाकेला नि:स्वार्थपणे धावतो
पार्थाला समयी उपदेशतो
हाकतो तो रथ क्षेत्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री

मैत्री म्हणजे ऐश्वर्य सगळे
मैत्रीविना व्यर्थ हे जगणे
कुशीत पर्वतांच्या आकाश झुकते
मेघांसंगे वारे स्वैर धावते
जीवनप्रवासात तुझीच साथ यात्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री

सुखदु:खात सामील होशी
फळे गोमटी वाटून खाशी
पूरक परस्परांना असशी
भांडशी फिरुनी गळे भेटशी
येशी धावूनी मदतीला दिवसा वा रात्री
धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री


-----
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----

sachinikam

धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री  - Happy Friendship Day!

sachinikam

धन्य जाहलो लाभली तुझी निरागस मैत्री  - Happy Friendship Day!

sachinikam


Dipak Dighe.

चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत,
जवळ असताना मात्र एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही!!!Deep

sachinikam