लावण्यखणी

Started by sachinikam, March 20, 2015, 03:34:32 PM

Previous topic - Next topic

sachinikam


लावण्यखणी

कशी चमचमते बिंदी भाळी
जशी चांदणी आभाळी

कशी खणखणती कांकणे हाती
जशी पाखरे किलबिल गाती

कशी रुणझुणती पैंजणे पाउली
जशी आरती राउळी

कशी मोहरते गाली लाली
जशी ताटवे गुलाबी

कशी डुलती कुंडले कानी
जशी परी हिंदोळी

कशी लखलखते माळ गळी
जशी नक्षत्रांची रांगोळी

सुबक सुरेख दिसते देखणी
नटली थटली लावण्यखणी.

-----
कवितासंग्रह: मुकुटपीस
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----

sachinikam

सुबक सुरेख दिसते देखणी
नटली थटली लावण्यखणी.

sachinikam

सुबक सुरेख दिसते देखणी
नटली थटली लावण्यखणी.